उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली गाठणार ! श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा,

Foto
मुंबई : दुसर्‍यांदा ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पाडून सहा खासदार फोडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दिल्लीमध्ये वजन वाढले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरविस्तारामध्ये शिवसेना शिंदे गटाला कॅबिनेट मंत्रीपदासह आणखी एक मंत्रीपद मिळेल अशी चर्चा रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज (१ जुलै) एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा होणार असल्याची चर्चा आहे.केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात यांचा हा दिल्ली दौरा असल्याचं बोललं जात आहे. खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांनी हे केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा सुद्धा जोरात रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच हा शिंदे यांचा दौरा होत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. 

धर्मेंद्र प्रधान (केंद्रीय शिक्षण मंत्री): देशातील राष्ट्रीय प्रवेश परीक्षांच्या कथित पेपर लीक वादामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव आहे. त्यामुळे या फेरबदलात त्यांची मंत्रिमंडळातून सुट्टी होऊ शकते, असे मानले जात आहे.
हरदीप सिंह पुरी (पेट्रोलियम मंत्री): हरदीप सिंह पुरी यांनाही मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्ष संघटना किंवा अन्य जबाबदारीसाठी त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.
याशिवाय, ज्या मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक राहिलेली नाही किंवा ज्या राज्यांमध्ये आगामी काळात निवडणुका आहेत, तिथले समीकरण साधण्यासाठी काही कनिष्ठ मंत्र्यांनाही डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे.
किती नवीन चेहरे येऊ शकतात? 
शक्तिकांत दास (माजी गव्हर्नर, आरबीआय): रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव शक्तिकांत दास यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. त्यांना थेट मंत्रिमंडळात आणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
श्रीकांत शिंदे (खासदार, शिंदे गट): महाराष्ट्रातून महायुतीचे समीकरण मजबूत करण्यासाठी आणि शिंदे गटाला योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात एन्ट्री होण्याची दाट शक्यता आहे.
अरुण गोविल (खासदार, भाजप): रामायण फेम आणि मेरठचे नवनिर्वाचित खासदार अरुण गोविल यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

किती मंत्र्यांचे प्रमोशन होऊ शकते?
काही सध्याच्या मंत्र्यांनी आपल्या कामाची चमक दाखवली आहे, तसेच पक्षाच्या अंतर्गत गणितात त्यांचे स्थान मजबूत झाले आहे, अशा नेत्यांना प्रमोशन मिळू शकते
अनुराग ठाकूर: भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना कॅबिनेट रँकमध्ये अधिक महत्त्वाचे स्थान दिले जाण्याची शक्यता असून, अनुराग ठाकूर यांच्यासारख्या नेत्यांना अधिक मोठ्या भूमिकेत आणले जाऊ शकते.
काही राज्यमंत्र्यांना त्यांच्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस म्हणून स्वतंत्र प्रभार किंवा थेट कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळण्याची शक्यता आहे.

किती मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात?
सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सध्या मोठी जबाबदारी आहे, मात्र सूत्रांच्या हवाल्याने आलेल्या माहितीनुसार, आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास देशाचे नवे अर्थमंत्री बनू शकतात.धर्मेंद्र प्रधान यांच्या संभाव्य एक्झिटनंतर, शिक्षण खात्याची धुरा निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवली जाऊ शकते, अशीही दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.